सांगवी सोनगाव-सरडे रस्त्यावर खड्डे की 'मृत्यूचे सापळे'?प्रशासकीय झोप आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार
प्रतिनिधी सरडे सांगवी, सोनगाव आणि सरडे या गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता सध्या चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरला आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून, संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार नक्की कोणाचे हित जोपासत आहेत, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. कामाचा केवळ फार्स? मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, हे काम 'खड्डे बुजवण्यासाठी' आहे की केवळ 'दाखवण्यासाठी', असा प्रश्न पडतो. एका ठिकाणी खड्डा बुजवला तर दुसरा तसाच उघडा ठेवला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्डे पुन्हा जैसे थे होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे आणि प्रवाशांचे हाल या रस्त्यावरून दररोज शेकडो शेतकरी आपल्या शेतमालाची ने-आण करतात. मात्र, रस्त्यावर 'खड्डे आहेत की गड्डे' हेच समजेनासे झाले आहे. "येथून प्रवास करताना जीव मुठीत धरून किंवा हात गळ्यात घालूनच प्रवास करावा लागतोय का?" असा उपरोधिक सवाल प्रवाशांनी विचारला आहे. अधिकारी झोपलेत की काय? रस...