सरडे गावात कमिशनखोर नको, तर कर्तबगार सरपंच हवा!जुन्यांच्या भ्रष्ट कारभाराला आता पूर्णविराम द्या!


निर्भीड आणि सुशिक्षित नेतृत्वाला संधी द्या!

सरडे गावचा 'सरपंच' कसा असावा? कमिशनखोर नको तर निर्भीड आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज; ग्रामस्थांचा सूर

फलटण (प्रतिनिधी):
फलटण तालुक्यातील सरडे गावच्या राजकीय वर्तुळात सध्या आगामी सरपंच निवडीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी सरपंच थेट जनतेतून निवडून दिला जाणार असल्याने गावाची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची, याबाबत ग्रामस्थ आणि विशेषतः तरुणांमध्ये कमालीची जागरूकता पाहायला मिळत आहे. "गावचा विकास करणारा सरपंच हवा, कमिशन खाणारा नसावा," अशी स्पष्ट भूमिका आता नागरिक मांडू लागले आहेत.
मागच्या काही वर्षांत सरडे गावामध्ये वारंवार सरपंच बदल झाले. सत्तेच्या या खेचाखेचीमुळे गावाच्या शाश्वत विकासाला खिळ बसल्याचे चित्र आहे. ज्यांना यापूर्वी संधी दिली, त्यांनी नेमके काय केले? गावासाठी किती निधी आणला आणि त्यातील किती 'कमिशन' पदरात पाडून घेतले? याचा हिशोब आता तरुण वर्ग मांडू लागला आहे. "ज्यांनी आधी निवडणुका लढवून फक्त स्वतःचे खिसे भरले, अशांना पुन्हा संधी नको," असा सूर गावात उमटत आहे.

सरडे गावातील सुज्ञ नागरिक आणि तरुणांच्या मते, नवीन सरपंच हा केवळ नावापुरता नसावा. तो खालील गुणांनी युक्त असावा: ग्रामपंचायत स्तरापासून ते मंत्रालय स्तरापर्यंत गावाचे प्रश्न मांडण्याची धमक त्याच्यात असावी: तालुका किंवा जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांसमोर बसून गावाच्या हक्काचा निधी खेचून आणणारा असावा: गावाच्या कामात कमिशन घेऊन मुंबईला वाऱ्या करणारा नसावा, तर स्वतःच्या कष्टाने आणि निस्वार्थी भावनेने गावाचा विकास करणारा असावा: जुन्या राजकारण्यांनी गावाची परिस्थिती कठीण करून ठेवली आहे, त्यामुळे आता सुशिक्षित आणि नवीन नेतृत्वाला संधी देण्याची वेळ आली आहे.
तरुणांचा सक्रिय सहभाग गरजेचा
राजकारणापासून लांब राहून चालणार नाही, तर गावाच्या भवितव्यासाठी तरुणांनी या निवडणुकीत सक्रियपणे उतरणे गरजेचे आहे. जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात सरडे गावातील राजकारण आणि विकास अत्यंत कठीण परिस्थितीत सापडेल, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच, सरडे गावात आता बदलाचे वारे वाहू लागले असून, 'कमिशनखोर नको, तर गावचा विकास करणारा खंबीर सरपंच हवा' हीच जनभावना प्रबळ होताना दिसत आहे.

सरडे ग्रामपंचायत 
वॉर्ड निहाय स्टोरी भाग १


Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?