ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते
दाखल गुन्ह्याचा तपास डीवायएसपी फलटण यांच्याकडून काढून पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर यांच्याकडे देण्यात यावा- वैभव गीते
ढवळ - फलटण तालुक्यातील ढवळ येथील अल्पवयीन 15 वर्षीय वैष्णवी रिटे व तिची बहीण तिच्या शेतामध्ये जात असताना या मुलीस बोलावून ढवळ येथील अंजूबाई तांबे या महिलेसह मुलगा अर्जुन रघुनाथ तांबे यांनी मिळून आमच्या शेतात का आली या कारणावरून तसेच आमच्या शेतातून कांद्याची पात चोरली म्हणून वैष्णवी रिटे सह तिची बहीण या 15 वर्षीय मुलीस झाडास बांधून मारहाण केल्या बाबत फलटण ग्रामीण पोलीस २४/ ०१/२०२५ रोजी तक्रार दाखल असून देखील अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. आरोपींना अटक न केल्या मुळे लघेच काही दिवसातच वैष्णवी रिटे हिच्या आईला सुद्धा त्याच प्रमाणे जातीवाचक शिवीगाळ केली आहे याचा सुद्धा फलटण पोलीस स्टेशन मध्ये ०२/०२/२०२४ रोजी तक्रार दाखल आहे. तरीही अद्याप आरोपींना अटक केली नाही . गावात पोलीस बंदोबस्त ठेवलेला कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांनी कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतलेला नसून घटनास्थळी भेट देऊन शांतता समितीची बैठक घेतलेली नाही.फिर्यादी व साक्षीदारांवर पुन्हा हल्ला झाल्यास त्यांना धाकधपटशा दाखवल्यास मा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनेवाढ्यातील प्यारा सतरानुसार लोकसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी जोर धरत आहे. फलटण तालुक्यातील तरड गावामध्ये तीन महिन्यांपूर्वी व बरड या गावात दोन महिन्यांपूर्वी गंभीर स्वरूपाचे ॲट्रॉसिटी चे गुन्हे दाखल होऊन सुद्धा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नसल्याचे वैभव गिते यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील ढवळ गावातील अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा झाला असून देखील सातारा जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी समाज कल्याण अधिकारी यांनी या घटनेस अद्याप भेट दिली नाही . किंव्हा फलटण तालुक्याचे आमदार हे अनुसूचित जाती जमाती मधून निवडण येवून सुद्धा अशा घटना घडल्या तरी देखील आमदार सुद्धा कुटुंबाचे सांत्वन करण्यास गेले नाहीत. फलटण तालुका हा दलित आदिवासी बौद्धांवर अन्याय अत्याचार करणारा तालुका म्हणून महाराष्ट्रात नावलौकिकास येत आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष देणे आवश्यक आहे. लवकरात लवकर अटक न केल्यास नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करणार असे वैभव गीते बोलले आहेत.
Comments
Post a Comment