जिल्हाधिकारी गोखळीतील बेकायदेशीर माती उत्खननाकडे गांभीर्याने लक्ष घालणार ; राजकीय आश्रयामुळे स्थानिक महसूल यंत्रणा छडीचूप ?
फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील गोखळी महसूल हद्दीत गेल्या कित्येक दिवसांपासून बेकायदेशीर माती उत्खननाचा (माती उपसा) धुमाकूळ सुरू आहे. या बेसुमार उत्खननामागे स्थानिक राजकीय बड्या नेत्यांचा वरदहस्त असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, माती माफिया वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशालाही जुमानत नसून, स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी (सर्कल) मात्र 'मलिदा' खाण्यात व्यस्त असून पूर्णपणे बेशिस्तपणे कारभार हाकत असल्याचा संतप्त आरोप गोखळीसह परिसरातील नागरिकांमधून केला जात आहे. गोखळी परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने मातीचे उत्खनन करून तिची अवैध वाहतूक सुरू आहे. नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या या प्रकाराकडे संबंधित महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत. “वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुमानायचे नाही आणि हाताखालील कर्मचाऱ्यांनी मलिदा खाऊन गप्प बसायचे”, असा कारभार सध्या गोखळी महसूल क्षेत्रात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. माती उत्खननासाठी ज्यांना परवाने (रॉयल्टी) दिले आहेत, त्यांच्याकडून दिलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी ...