जैन सोशल ग्रुप अध्यक्ष श्री श्रीपाल जैन यांचे हस्ते पाच पांडव आश्रम शाळा अलगुडेवाडी येथे ध्वजारोहण संपन्न!
फलटण-भारतीय स्वतंत्र दिनाच्या 80 व्या वर्धापन दिना निमित्त अलगुडेवाडी येथील पाच पांडव आश्रम शाळा येथे जैन सोशल ग्रुप फलटण चे अध्यक्ष श्री श्रीपाल जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण रोहन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाच पांडव आश्रम शाळा संस्थे चे अध्यक्ष श्री.महादेव नाळे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. जैन सोशल ग्रुप कडून इयत्ता दहावी मध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये 1000 बक्षीस देण्यात आले.
यावेळी बोलताना श्री.श्रीपाल जैन यांनी सर्वांना स्वतंत्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व स्वतंत्र मिळवणे जेवढे कठीण होते तेवढे ते टिकवणे कठीण आहे, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन केले. आजच्या काळात देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकां बरोबरच देशातील चांगले डॉक्टर ,वैज्ञानिक ,इंजिनियर,तंत्रज्ञ व शेतकरी यांचीहि गरज असल्याचे सांगितले.
यावेळी जैन सोशल ग्रुप कडुन संस्थेचे अध्यक्ष श्री.महादेव नाळे,संचालक श्री.संतोष नाळे याचां शाल व मोती माळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जैन सोशल ग्रुप चे सदस्य श्री.नंदकुमार दोशी सर ,संगिनी फोरमच्या माजी अध्यक्षां सौ.अपर्णा जैन, संस्थेचे पदाधिकारी,आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय शिंदेसर व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.जैन सोशल ग्रुप कडून विद्यार्थ्यांना बिस्किट पुडे वाटप करण्यात आले.अलगुडे वाडीतुन विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली होती. श्री. नंदकुमार दोशी सर यांचेही स्वतंत्र दिनानिमित्त भाषण संपन्न झाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन देवकाते सर यांनी केले.
Comments
Post a Comment