क्रांतिसिंह नाना पाटील यांची 126 वी जयंती उत्साहात साजरी*
*सरडे ता. फलटण* : क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांची _126 वी जयंती_ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक _श्री दादासाहेब एजगर सर_ यांनी केले. प्रस्ताविकेत त्यांनी नाना पाटील यांना _शेतकऱ्यांचे कैवारी, तुफान सेनादलाचे संस्थापक, देशभक्तीचे प्रेरणास्थान, जीवनाला दिशा देणारे दीपस्तंभ, मराठीचा अभिमान आणि स्वातंत्र्याचा महान योद्धा_ अशा शब्दांत आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी _युथ असोसिएशन संस्थेचे माजी चेअरमन श्री विठ्ठल कुशाबा बेलदार_ तर प्रमुख पाहुणे म्हणून _संस्थेचे संस्थापक सचिव श्री हनुमंतराव एजगर सर_ उपस्थित होते.
याप्रसंगी _युथ असोसिएशनचे विद्यमान चेअरमन श्री शत्रुघ्न बेलदार_ यांची देखील उपस्थिती लाभली.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी _श्री हरिश्चंद्र करडे, श्री सुखदेव बेलदार, श्रीमती कांचनताई पाटील_ तसेच शाळेचे मुख्याध्यापक _श्री अनिल खलाटे सर_ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले
इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाषणातून नाना पाटलांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांच्या देशभक्तीने सभागृह भारून गेले.
_श्री सुखदेव बेलदार पाटील_ यांनी नाना पाटील भूमिगत असताना सरडे गावी आले होते त्यावेळचा प्रसंग सांगून सर्वांना भारावून टाकले.
_श्री हनुमंतराव एजगर सर_ यांनी विद्यार्थ्यांना नाना पाटलांचे विचार जीवनात आत्मसात करण्याचे आवाहन केले. त्यांनी खंडकरी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य, सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय चळवळी आणि स्वातंत्र्यासाठी केलेल्या विविध आंदोलनांची माहिती दिली.
याप्रसंगी _ युथ असो .चे मा . चेरअमन श्री रावसाहेब बेलदार संचालक श्री . बाळासाहेब पाटील श्री यशवंत देवकाते सर, श्रीकांत पाटील सर, श्री महावीर बेलदार सर, सौ. मोरे मॅडम, सौ. विरनक मॅडम_, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री जाधव श्री भोईटे , आनंद बेलदार ,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन _क्रीडाशिक्षक श्री आप्पासाहेब वाघमोडे सर_ यांनी केले. त्यांनी "भक्ती आणि क्रांती यांचा संगम" या विषयावर प्रकाश टाकला. शेवटी दूध वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली
Comments
Post a Comment