सरडे गावातील एकाच कुटुंबातील दोन कन्यांचे उज्ज्वल यश: कोमल भोसले आणि स्नेहल भोसले यांचा प्रा वसंत हंकारे सरांच्या हस्ते सत्कार

सरडे (वार्ताहर):
ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करत गावाचा आणि कुटुंबाचा नावलौकिक वाढवला आहे. सरडे (ता. फलटण ) येथील एकाच कुटुंबातील दोन कन्यांनी सरकारी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले असून, संपूर्ण गावातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कु. कोमल रवींद्र भोसले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतून राज्य कर निरीक्षक (STI Officer) पदी निवड झाली आहे. तर, त्यांच्याच कुटुंबातील कु. स्नेहल किशोर भोसले यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (PDCC) लिपिक (Clark) पदी निवड झाली आहे. एकाच घरातील दोन मुलींची एकाच वेळी उच्च पदावर निवड झाल्याने भोसले कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
या दुहेरी यशाबद्दल प्रा. वसंत हंकारे सर यांच्या हस्ते दोन्ही यशस्वी कन्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रा. वसंत हंकारे म्हणाले, "ग्रामीण भागातील मुली योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाचे कोणतेही शिखर गाठू शकतात, हे या दोघींनी सिद्ध केले आहे. एकाच कुटुंबातील दोन कन्यांची सरकारी सेवेत झालेली ही निवड अत्यंत अभिमानास्पद असून परिसरातील इतर विद्यार्थ्यांना यामुळे नक्कीच प्रेरणा मिळेल."
या सत्कार सोहळ्याला भोसले कुटुंबातील सदस्य, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दोन्ही नवनिर्वाचित अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा