स्वातंत्र्य दिन ऑगस्ट क्रांती गौरव दिनानिमित्त वंदे मातरम सन्मान पुरस्कार गुणवंत कामगार श्री .राजेंद्र कांबळे सन्मानित

मुंबई, प्रतिनिधी, भांडुप येथील गुणवंत कामगार, समाजसेवक श्री. राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना मैत्री संस्था व युवा सामाजिक प्रतिष्ठान धडक कामगार युनियन महासंघ, स्वातंत्र्य दिन ,ऑगस्ट क्रांती गौरव व मैत्री दिनानिमित्त आयोजित, आरे कॉलनी गोरेगाव मुंबई, येथे मा. दिलीप सेनजी.प्रसिद्ध बॉलीवूड ओले ओले फेम अभिनेत्री ,पियू चव्हाण, मा. अभिजीत राणे कामगार नेते मा.विलास खानोलकर सदस्य फिल्म सेंसर बोर्ड मा.संभाजी जाधवराव राजमाता मासाहेब जिजाऊ यांचे चौदावे वंशज मा. अनघा राणे यांचे शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ मानचिन्ह सन्मानपत्र वंदे मातरम सन्मान पुरस्कार देऊन मोठ्या थाटामाटात सत्कार करण्यात आला .त्यावेळी मान्यवरांचे भाषण झाले त्यावेळी संस्थापक अध्यक्ष सुरज भोईर यांनी राजेंद्र कांबळे यांच्या कार्याचा आढावा घेतला त्यांचे काम सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक,सहकार आरोग्य सर्व ठिकाणी कार्यरत असून ते अष्टपैलू असल्याचे मैत्री संस्थापक अध्यक्ष सुरज भोईर यांनी जाहीर केले कांबळे यांची निवड केली त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळ मुंबई यांनी गेल्या वर्षी घेतली होती त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार मा. राज्यपाल मा.राज्यमंत्री मा.कामगार मंत्री मा.कामगार आयुक्त यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते . त्यांना आज पर्यंत शंभर होऊन अधिक पुरस्कार मिळालेले आहेत.अशा समाजसेवकाची निवड करणे योग्यच आहे कांबळे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. मैत्री संस्था व युवा सामाजिक प्रतिष्ठान यांचे संस्थापक अध्यक्ष मा. सुरज भोईर यांचा आज रोजी वाढदिवस आहे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यावेळी मान्यवरांनी त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी अँड नेहा दुबेजी मोहन जाधव डॉ.प्रभाकर कांबळे पत्रकार गुणवंत कामगार अँड ,सोपान बुडबाजकर साहित्यिक, डॉ.मंगला परब सूत्रसंचालन मनीषा मांढरे यांनी केले व मान्यवरांचे स्वागत सुवर्ण बामणे यांनी केले वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा