सौ. नसीम पटेल यांना 'जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार' जाहीर
५ सप्टेंबरला शिक्षक दिन शिक्षणाचा सन्मान मंगळवेढा येथे भव्य वितरण सोहळा
विशेष (प्रतिनिधी) राजू भाई काझी:
शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल खुपसंगी (ता. मंगळवेढा) येथील श्री. कामसिद्ध विद्यालयाच्या शिक्षिका सौ. नसीम मुक्तार पटेल यांना दैनिक ‘दामाजी एक्सप्रेस’ तर्फे दिला जाणारा ‘जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले विशेष प्रयत्न, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन
हा पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
दिनांक: शनिवार, ५ सप्टेंबर २०२६
वेळ: सायंकाळी ठीक ६.०० वाजता
स्थळ: आदित्य पॅलेस अँड गार्डन, हॉटेल नंदराज शेजारी, पंढरपूर रोड, मंगळवेढा
गौरव व अभिनंदन:
सौ. नसीम पटेल यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री. कामसिद्ध विद्यालय, खुपसंगी येथील ग्रामस्थ, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि मंगळवेढा तालुक्यातील शिक्षण प्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment