जिल्हा परिषद शाळा धनगरवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; गुणवंतांचा सत्कार

धनगरवाडी:
स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सकाळी विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. गावात काढण्यात आलेल्या प्रभात फेरीनंतर शाळेच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. यंदा ध्वजारोहणाचा बहुमान भारतीय सैन्य दलात नुकतेच भरती झालेले गावातील जवान श्री. संदीप पोपट मोटे यांना देण्यात आला.
ध्वजारोहणानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीत सादरीकरण झाले. शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत संचलन आणि संगीत कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारी देशभक्तीपर भाषणे दिली. कार्यक्रमादरम्यान तंबाखू मुक्ततेची सामूहिक शपथही घेण्यात आली. सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. प्रियांका भोकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विशेष सत्कार सोहळा
याप्रसंगी भारतीय सैन्य दलात भरती झाल्याबद्दल श्री. संदीप मोटे आणि महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल कु. धनश्री तालवर यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला ग्रामपंचायत धनगरवाडीच्या सरपंच प्रशासक सौ. यमुना शिवतरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पिसे, उपाध्यक्ष सौ. पूनम कदम व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना खाऊ वाटप केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शालेय कामकाजाचा आढावा मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण नरुटे सर यांनी घेतला. सूत्रसंचालन श्री. अविनाश नेवसे सर यांनी केले, तर आभार श्री. संजय गंगावणे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राची पाचे मॅडम, गीता तालवर आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा