फलटण उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न; पीडितांना सन्मानजनक वागणूक व कामांत तत्परता दाखवण्याचे अध्यक्षांचे निर्देश
आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समिती सभा अंतर्गत मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्या वेळी दक्षता समिती अध्यक्षा सौ आंबेकर मॅडम उपविभागीय तथा दंड अधिकारी साहेब मा तहसीलदार जाधव साहेब मा बिडीओ साहेब मा आमदार सचिनजी पाटील साहेब पोलीस विभागा कडून आलेले प्रतिनिधी व दक्षता समिती सदस्यां सनी घ काकडे नगर सेवक सचिनजी अहिवळे साहेब उपस्थित होते
त्या वेळी सनी घनशाम काकडे यांनी दक्षता समिती समोर खालील प्रमाणे मुद्दे मांडले
1) अट्रॉसीटी गुन्हा दाखल करताना पीडित वेक्तीला हिनतेची वागणूक देऊ नये दम दाटी करू नये
2) अट्रॉसीटी गुन्हा दाखल करायला आल्यावर पीडित वेक्तीचा त्वरित गुन्हा दाखल करून FRI ची प्रत द्यावी
3) फलटण शहर वा तालुक्यातील प्रत्यक पोलीस स्टेशनला अट्रॉसिटी कायद्याचे फलक लावावेत
4) अट्रॉसीटी गुन्हा दाखल झाल्यास 7 वर्षा पुढील आरोपात त्वरित अटक करण्यात यावे
5) अट्रॉसीटी गुन्हा दाखल झाल्यास 60 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करण्यात यावे
6) ग्रामीण भागातील दलित वस्ती निधी आल्यावर त्वरित त्या फंडा मधून विकास कामे करावीत
7) अट्रॉसीटी गुन्हा दाखल झाल्यावर समाज कल्याण विभागा मार्फत पीडित वेक्तीला अर्थसाह्य मिळावे
नगर सेवक सचिन अहिवळे यांनी ही खालील मुद्दे मांडले
1) ग्रामीण भागातील एसी प्रवर्ग साठी समाज मंदिराणा जागा उपलब्ध करून द्यावी
2)अट्रॉसीटी गुन्हा दाखल करायला आलेल्या पीडिताना पोलीस विभागा कडून सन्मान वागणूक द्यावी
आमदार मा सचिनजी पाटील साहेबांनी ही खालील मुद्धे मांडले
1) पोलीस विभागणी पीडित वेक्तीना न्याय द्यावा
2) दलित वस्ती फंडा च्या निधीचा त्वरित वापर करून दलित वस्तीत विकास करावा
3) दलित वस्ती मधील समाज मंदिरा साठी लागणाऱ्या जागा उपलब्ध करून द्याव्यात
4) संविधान मोहात्सव प्रत्येक शाळे मध्ये साजरा करावा
या वरील मुध्यावर चर्चा झाली
त्यावर दक्षता समिती अध्यक्षा सौ आंबेकर मॅडम उपविभागीय तथा दंड अधिकारी साहेब यांनी सर्व विषय टिपणीला ठेवून पोलीस प्रशासन व इत्तर विभागा कडून झालेल्या त्रुटी पुन्हा झाल्यास कायदेशीर बेबीना पुढे जावे लागेल हे सांगितले व जर 2 किव्हा 3 महिन्याला दक्षता समितीची मिटिंग होईल असे म्हंटले
सनी घनशाम काकडे व नगर सेवक सचिन अहिवळे सर यांनी सांगितले की
महाराष्ट्रातील फलटण येथे प्रथम अशी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समिती आहे की त्याचे सदस्या स्वतः आमदार मा सचिनजी पाटील साहेब आहेत
Comments
Post a Comment