तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते
फलटण - तरडगाव येथे 30 एप्रिल 2025, रोजी भैरवनाथ देवस्थान यात्रेच्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमादरम्यान एका दलित कुटुंबावर जातीय हल्ला झाल्याचे निष्पक्ष प्रकरणी लोणंद ग्रामीण पोलीस स्टेशनने अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (1989) आणि IPCच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याच्या घटनेत फलटण तालुक्यातील तरडगाव येथील मराठा समाजाच्या सदस्यांनी करुणा दिनेश गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचे तसेच जातीय शिवीगाळ केल्या बाबत लोणंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) सातारा यांनी जारी केलेल्या जा.क्र.सआसकसा/नाहसं/2023-24/1745 या पत्राद्वारे 24 तासांच्या आत घटनास्थळी तहसीलदार यांनी भेट देणे बंधनकारक करण्यात आहे. तहसीलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट द्यावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या ज्या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली असेल त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवावा.
या गुन्ह्यात तातडीने घ्यावयाच्या कारवाईत पंचनामा, घटनास्थळी फोटो/व्हिडिओग्राफी, साक्षीदारांचे जबाब नोंदविणे (CRPC 164 अंतर्गत) आणि आरोपींची तत्काळ अटक यांचा समावेश आहे. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्यसचिव वैभवजी गीते यांनी प्रशासनाकडे जलद न्यायाची मागणी केली असून,बौद्ध अनुसूचित जातीतील नागरिकांना मारहाण जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्यावर क्रॉस गुन्हा दाखल केल्याने राज्य सचिव वैभव गीते यांनी शासन व प्रशासनाचा निषेध केला आहे. तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबत लक्ष घालून कडक कारवाई करण्याची आग्रही मागणी देखील केली आहे.
केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाला अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्या बाबत लवकरच जिल्हा अधिकारी सातारा, प्रांत फलटण, तहसीलदार फलटण यांना निवेदन देणारं असल्याचे बोलले आहेत.
Comments
Post a Comment