फलटण तहसीलदारांचा 'दौरा' नक्की कुठे? कार्यालयासमोर नागरिकांचा ठिय्या; सामान्य जनतेचे हाल

फलटण:
तालुक्याचे मुख्य प्रशासकीय केंद्र असलेल्या फलटण तहसील कार्यालयात सध्या अजब परिस्थिती पाहायला मिळत आहे. तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव हे नेमके कोणत्या दौऱ्यावर आहेत, की अन्य कोणत्या कामात व्यस्त आहेत, याची कोणतीही अधिकृत माहिती फलटणच्या सामान्य जनतेला मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण भागातून शेतकरी आणि कष्टकरी जनता आपली महत्त्वाची कामे आणि कागदपत्रांवर तहसीलदारांची सही घेण्यासाठी पदरचे पैसे खर्च करून शहरात येतात. कोणी उसने पैसे घेऊन, तर कोणी कोणाची तरी दुचाकी मागून घेऊन तहसील कार्यालय गाठत आहे. मात्र, तासनतास वाट पाहूनही तहसीलदार भेटत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे.

नागरिकांचे हाल: अनेक वृद्ध आणि महिला नागरिक सकाळपासून कार्यालयासमोर थांबून आहेत. तासनतास वाट पाहिल्यामुळे थकलेले नागरिक तहसील कार्यालयासमोरच आळसाचे जांभळ्या देत बसले असल्याचे चित्र दिसत आहे.
 तहसीलदार जर दौऱ्यावर असतील, तर तसा फलक किंवा माहिती कार्यालयाच्या सूचना फलकावर असणे अपेक्षित आहे. मात्र, कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
 अनेक शासकीय योजना, दाखले आणि तातडीच्या कामांसाठी तहसीलदारांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. मात्र, अधिकारी उपस्थित नसल्याने ही कामे रखडली आहेत.

"आम्ही ग्रामीण भागातून एवढ्या लांबून येतो, पण साहेब कधी भेटणार हे कोणीच सांगायला तयार नाही. साहेब कामासाठी बाहेर गेले आहेत की एन्जॉय करायला? आम्हाला फक्त चकरा मारायला लावल्या जात आहेत," अशा शब्दांत एका संतप्त नागरिकाने आपली व्यथा मांडली.

या संपूर्ण प्रकरणावर आता वरिष्ठ प्रशासन काय दखल घेणार आणि तहसीलदारांच्या उपस्थितीबाबत पारदर्शकता येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?