कृतिशील शिक्षणातून बालकांचा सर्वांगीण विकास : मा.सौ.वसुंधरा नाईक निंबाळकर



शिक्षण ही सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. बालकांच्या मध्ये संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे असते ते करण्यासाठी विविध साहित्याचा कृतिशील वापर करून गणित , भाषा , सामान्य ज्ञान या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे आपण रुजवू शकतो मुधोजी बालक मंदिर येथील शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शनात मांडलेल्या सर्व वस्तू उत्तम शैक्षणिक साहित्य आहे असे मत मुधोजी बालक मंदिर येथे आयोजित भव्य बालवाडी साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रशालेच्या चेअरमन वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांनी आपले विचार व्यक्त केले 

कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन सौ. नूतन अजितराव शिंदे, श्रीमती .रणवरे मॅडम याप्रसंगी भारतीय पत्रकार संघ साताराचे पदाधिकारी विकास शिंदे , राजकुमार काकडे , हिंदुराव गायकवाड , गणेश भोईटे , जुबेर कोतवाल , आप्पासाहेब तांबे , शेखर गायकवाड,मुख्याध्यापक रुपेश शिंदे सौ. राजश्री खलाटे , सौ. मंदा चौधरी. सौ. सावंत, सौ. साबळे मॅडम तसेच काकडे मॅडम व शेख मॅडम उपस्थित होते.

प्रा विकास शिंदे यांनी भारतीय पत्रकार संघाच्या वतीने अभिप्राय व्यक्त करताना बालवाडीमध्ये शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयानुसार प्रदर्शनातील साहित्याची आकर्षक मांडणी केल्यामुळे प्रत्येक विषयाचे ज्ञान बालकांना कृतिद्वारे, प्रात्यक्षिकद्वारे अनुभव घ्यायला देऊन शिक्षण दिले जाते हे दिसून येते शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शाळेतील शिक्षक यांचे आभार मानले हे प्रदर्शन फलटण मधील सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी नक्की पाहण्यासाठी यावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले

या प्रदर्शनासाठी शाळेतील शिक्षकवृंदानी विशेष मेहनत घेतली प्रदर्शनाला शिक्षक , पालक ,विध्यार्थी व नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला मुधोजी बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता रजपूत यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?