आई प्रतिष्ठानचे कर्तृत्ववान महिला पुरस्कार जाहीर- जयश्री तांबे

फलटण शहर प्रतिनिधी:- जुबेरभाई कोतवाल

 आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य आयोजित,जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना " *राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार*" जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन द्वारे देण्यात आला आहे.

समाज हितासाठी कार्य करण्याची भक्ती आणि तुम्हाला सदैव प्रेरणा देणारे तुमची स्त्री शक्ती यांचा आम्ही आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मानपत्र देऊन गौरव करीत आहे.

लाभे स्त्री शक्तीचे वरदान
दातृत्व कर्तृत्व महान 
व्हावी जगी कीर्ती
 तू नवशक्ती मांगल्यमूर्ती 

या उक्तीप्रमाणे खालील महिला भगिनींना पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये ,
सौ. मिनाक्षी संभाजी ढोपे मुख्याध्यापक शाळा- मातोश्री यमुनाबाई लिमये अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा,पडसरे. तालुका- सुधागड जिल्हा -रायगड, सौ.वंदना राहुल हावरे, शाळा पांडेवाडी. ता-वाई,
सौ.अलका विजयकुमार पिसाळ शाळा मायणी (मुली)ता- खटाव,
सौ.सारिका अमित कदम शाळा पळशी.ता - खंडाळा,सौ.उर्मिला बाळासाहेब वसव शाळा खटकेवस्ती ता- फलटण,श्रीमती.सीमागौरी नवनाथ पवार शाळा बोरगाव 
तालुका- सातारा,सौ. आरती महादेव जाधव पदवीधर शिक्षिका ( शिक्षण सेवक )
शाळा मुळीकवाडी,ता - फलटण,सौ.दिपाली प्रवीण हिरवे शाळा नवेनगर ता - महाबळेश्वर,सौ.छाया चंद्रकांत चव्हाण शाळा वाठारगाव
ता- कोरेगाव,श्रीमती. प्रिया योगीराज ताटे शाळा नाथाचीपाग ता- पाटण,
सौ. मंगल ज्ञानेश्वर माने शाळा वारवंड ता- फलटण,सौ. रेश्मा दत्तात्रय भोसले केंद्रशाळा कोपर्डे हवेली ता.कराड
सौ.मनिषा नितीन म्हेत्रे शाळा गेळदरे,ता.जावली,
सौ.मनिषा रूपचंद बोराटे.केंद्रशाळा वावरहिरे ता. माण.

इ.महिला भगिनींना ऑनलाईन मानपत्र देवून गौरव करण्यात आला.अशी माहिती आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य अध्यक्षा जयश्री तांबे , उपाध्यक्षा रंजना सानप, कार्याध्यक्षा मनिषा शिरटावले, सचिव अनुपमा दाभाडे, सहसचिव अनिता जाधव 
यांनी दिली आहे. 

२१व्या शतकाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला उत्कृष्ट अशा कार्य करत आहेत. अशा कार्याची दखल घेऊन त्यांचा उचित सन्मान केल्यानंतर त्यांना अजून जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळते.आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर हे नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्यामुळे जिल्ह्यातून अशा उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?