कोळकी येथे वृक्षकटाईमुळे रस्ता बंद; आजार्‍यांच्या जीवाला धोका, प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी

कोळकीत झाडे तोडून रस्ता बंद; आजार्‍यांचे प्राण धोक्यात,

फलटण तालुक्यातील कोळकी गावात रस्ता रुंद करण्याच्या नावाखाली झाडे तोडल्यामुळे फलटण-शिंगणापूर रोडवरील महत्त्वाचा रस्ता बंद झाला असून, यामुळे आजार्‍यांना दवाखान्यात नेहण्यास अडचण येत आहे. नागरिकांनी सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही रस्ता उघडण्यात आला नसल्याने रात्रीतच उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

कोळकी ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर कॉन्ट्रॅक्टर सुरेश धायगुडे यांच्या कामातून तालुक्यातील अनेक झाडे, विशेषतः लिंबाची सह अनेक झाडे तोडली गेली. यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला असून, या भागातील शासकीय कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही. नागरिक म्हणतात, "आजार्‍यांना ऐन वेळी दवाखान्यात नेता येणार नाही, प्राण धोक्यात आहेत." ग्रामपंचायतीने लक्ष दिले नसल्याने आरोपही स्थानिकांनी केला आहे.

फलटण शहरात "स्वच्छ फलटण, सुंदर फलटण, झाडे लावा झाडे जगवा" असे घोषवाक्य असताना वृक्षकटाई करणे हे विरोधाभासी असल्याचे नागरिक सांगत आहेत. सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी कोळकी यांना माहिती दिल्यानंतरही कोणतीही हालचाल झालेली नाही. नागरिकांनी दखल घेऊन तात्काळ रस्ता उघडण्याची विनंती केली असून, वृक्ष कट करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करून आजार्‍यांच्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 



Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?