महाडच्या चवदार तळ्यासाठी 55.80 कोटींचा प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल शासनाच्या आभारी आहोत... वैभव गिते
महाड येथील चवदार तळे हे सामाजिक समतेच्या लढ्याचे प्रतीक मानले जाते. येथेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह करून अस्पृश्यांनाही सार्वजनिक पाण्याचा हक्क मिळावा, यासाठी आवाज उठवला होता. या सत्याग्रहामुळे देशातील सामाजिक क्रांतीला नवी दिशा मिळाली होती. येत्या २० मार्चपासून या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असल्याने यंदाचा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
नॅशनल दलित मुव्हमेंट या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात महाड क्रांतिभूमी सत्याग्रहास शंभरावे वर्ष सुरू होत असल्याने विविध कार्यक्रम उपक्रम शासनामार्फत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे यांच्या वतीने राबवावेत. म्हणून महासंचालक BARTI यांना भेटून वैभव गिते, गोविंद मोरे, आप्पा गायकवाड, भाऊराव तायडे, जय भैया माने, यांनी भेटून निवेदन देऊन चर्चा केली.तसेच शासनास निवेदन पाठवून महाडच्या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. तसेच महाड प्रांताधिकारी यांच्या उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत देखील राज्य सचिव वैभव गिते यांनी ही मागणी लावून धरली होती.
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी महाड चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली होती.
18 फेब्रुवारी 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सामाजिक व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने हा शासन निर्णय काढण्यात आला आहे. यासाठी आम्ही राज्याचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेब (IAS), समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे (IAS) यांचे संघटने मार्फत आभारी आहोत.
चवदार तळे परिसराचा विकास, जलशुद्धीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सुमारे ५५.८० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पामध्ये तळ्याचे जलशुद्धीकरण, परिसराचे सुशोभीकरण, पर्यटन सुविधा तसेच ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे
चवदार तळे हे केवळ ऐतिहासिक ठिकाण नसून सामाजिक समतेच्या संघर्षाचे प्रतीक आहे. त्यामुळे शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारे हे विकासकाम राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव यांच्या मार्गदशनाखाली महाडच्या इतिहासात नवा अध्याय ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तसेच या प्रकल्पामुळे महाडच्या ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळेल
सुशोभीकरणाचे काम तात्काळ सुरू करावे. सर्व कामे अतिशय दर्जेदारपणे होण्यासाठी उपविभागीय अधिकारी महाड तसेच मुख्याधिकारी नगरपालिका महाड यांनी या कामावर देखरेख करावी.
वैभव तानाजी गिते
राज्य सचिव,नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस
8484849480
Comments
Post a Comment