दहिवडीचे पोलीस अंमलदार विशाल वाघमारे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गौरव

सातारा जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यांचा गौरव करण्यात आला असून, यामध्ये दहिवडी पोलीस ठाण्याने बाजी मारली आहे. 'नॉन बेलेबल वॉरंट' (NBW) बजावणीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल दहिवडी पोलीस ठाण्याला "सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.

यामध्ये दहिवडी पोलीस ठाण्याचे अंमलदार विशाल भीमराव वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत प्रभावीपणे वॉरंट बजावणीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला.
संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये 'नॉन बेलेबल वॉरंट' बजावण्यात दहिवडी पोलीस ठाणे अव्वल ठरले पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी १७ मार्च २०२६ रोजी हे प्रमाणपत्र प्रदान केले आणि भविष्यातही अशीच कामगिरी करण्याची आशा व्यक्त केली.पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे.

विशाल भीमराव वाघमारे यांच्या या यशामुळे दहिवडी पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे"

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?