दालवडी गावातील मागासवर्गीय वस्ती मधील दिव्याला वेलींच पांगरून..! ग्रामपंचायत अधिकारी यांचे लक्ष कुठे ?
फलटण तालुक्यातील दालवडी गावातील मागासवर्गीय वस्ती दिवा वेलींच्या झुडपणांचे पांगरून झाले आहे. या ठिकाणी या लाईट असलेल्या पोलच्या खांबावर गेले कित्येक दिवस हे वेलींचे पांगरून जश्या तसे असल्याचे पाहायला मिळत आहे. येथील स्थानिक नागरिकांनी तोंडी सांगून सुद्धा ग्रामपंचायत अधिकारी मुद्दाम पने मागासवर्गीय वस्ती असल्याकारणाने या कडे दुर्लक्ष केल्याचे चर्चा सुरू आहे.
याच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संविधान अमृत महोत्सव सुद्धा करण्यात आला नाही. जिल्हाधिकारी यांचे नियम आदेश गटविकास अधिकारी यांचे पत्र असून सुद्धा अमृत महोत्सव साजरा केला नाही म्हणून यांना बडतर्फ करावे यासाठी NDMG संघटनेच्या वतीने येत्या १० तारखेला पंचायत समिती फलटण येथे उपोषण सुद्धा होणार आहे .
हेच ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक दालवडी गावात राहत नाहीत मुख्यालय राहत नाहीत असे सुद्धा स्थानिक नागरिक सांगत आहेत
संबंधित अधिकारी यांना जाण्याचा येण्याचा मार्ग असताना कित्येक वेळा ये जा करताना पाहिले पन असेल पण मुद्दाम पने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
गावातील मुख्य रहदारीचा रोड लगत समाज मंदिर सुद्धा आहे बल्ब आहे पोलवर पण उजेड नसल्यामुळे सुरक्षा लोकांची होण्यापेक्षा बल्ब ला सुरक्षा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष पणामुळे झाली आहे.
मागासवर्गीय निधीतून दिवा बत्तीस किती निधी गेला कुठे गेला हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे.
भाग १
Comments
Post a Comment