ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी संविधान अमृत महोत्सव साजरा न केल्याने बडतर्फ करा NDMG संघटनेच्या वतीने १० तारखेला पंचायत समिती फलटण येथे उपोषण - वैभव गीते

दालवडी गावचे ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी संविधान अमृत महोत्सव साजरा न केल्याने यांना बडतर्फ करा यासाठी नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या वतीने येत्या 10 तारखेला पंचायत समिती फलटण येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गीते यांनी सांगितले आहे.
देशभर संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम सर्वत्र सुरू असून सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात काही ग्रामपंचायत मध्ये संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात आला नाही म्हणून संघटनेच्या वतीने शेकडो पदाधिकारी यांच्या माध्यमातून सह तालुक्यातील आंबेडकरवादी संघटना तसेच सर्व नागरिक मिळून फलटण पंचायत समितीच्या समोर उपोषण करण्यात येणार आहे.
दालवडी गाव मध्ये संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी यांनी दुर्लक्ष केले तर या कडे लक्ष देण्याचे काम प्रामुख्याने विस्तार अधिकारी यांचे होते परंतु या दोघांनी मिळून मुद्दाम कार्यक्रम दालवडी गावात घेतले नसल्याचे काही ग्रामस्थ बोलत आहेत. तालुक्यातही अजून काही अशा ग्रामपंचायत आहेत परंतु गावातील लोकांच्या तक्रारी संघटनेकडे आल्याने उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
जो पर्यंत बडतर्फ होणार नाही तो पर्यंत संघटनेच्या वतीने उपोषण चालूच राहणार असल्याचे सांगितले आहे.
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या किंव्हा संविधानाचा जागर करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच मा. जिल्हाधिकारी यांचे नियम तसेच गटविकास अधिकारी यांचे नियम मोडणाऱ्या दालवडी गावच्या ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी उपोषण सुरू राहील असे सांगितले आहे.
संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी सकाळी १० वाजता १० तारखेला पंचायत समिती फलटण येथे उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे 





Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?