फलटण ही श्रीराम प्रभूंची पावन 'रामनगरी' आहे! इथे अन्यायाचा घडा भरल्यानंतर काळ कोणालाही सोडत नाही
फलटण प्रांत कार्यालयात कारभाराचा बोजवारा; नागरिक हैराण! प्रश्नांचे निवारण की राजकीय निष्ठा? फलटण तालुक्यातील कामांसाठी नागरिकांची भटकंती! फलटण (विशेष प्रतिनिधी): फलटण प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनात कामांचा पार बोजवारा उडाला असून, आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि विविध प्रशासकीय कामांसाठी येणारे सामान्य नागरिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अत्यंत हैराण झाले आहेत. फलटण तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्न असोत किंवा प्रशासनाशी संबंधित इतर कोणतीही कामे, मार्ग काढण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी बसलेले अधिकारी हे प्रशासकीय परीक्षा पास होऊन आले आहेत की केवळ "राजकीय परीक्षा" पास झाले आहेत? असा संतप्त सवाल आता तालुक्यातील सामान्य जनता विचारू लागली आहे. फलटणला येण्यापूर्वी राजकीय परीक्षा द्यावी लागते का? फलटण तालुक्यात कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची बदली झाली की, आधी त्यांना एखाद्या राजकीय पाठिंब्याची किंवा राजकीय परीक्षेची पायघडी घालूनच यावे लागते का? अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. प्रशासकीय सेवेचा मूळ उद्देश सर्वसामान्यांना न्याय देणे हा असतो; परंतु, या ठिकाणी अधिकाऱ्या...