क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे ता . फलटण मध्ये स्व. अजितदादा पवार जयंती उत्साहात साजरी
*क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे* - येथे आज मा. स्वर्गीय *अजितदादा पवार* यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात *श्री. दादासाहेब एजगर सर* यांच्या प्रस्ताविकाने झाली. त्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक कार्याचा आणि विचारांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.
कार्यक्रमासाठी *शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल खलाटे सर* हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान *ज्येष्ठ शिक्षक श्री. यशवंत देवकाते सर* यांनी भूषवले. त्यांनी स्वर्गीय अजितदादा यांच्या कार्याची माहिती दिली
यावेळी *श्री. बेलदार सर, श्री. पाटील सर, सौ. शिंदे मॅडम, सौ. मोरे मॅडम आणि सौ. विरणक मॅडम* यांची प्रमुख उपस्थिती होती. इ ९ वी १० वी मधील विद्यार्थ्यांनी भाषण, गायन माध्यमातून स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन केले. तसेच शाळेत वृक्षारोपण आणि विचार मंथन स्पर्धा देखील घेण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक श्री. आप्पासाहेब वाघमोडे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
---
Comments
Post a Comment