फलटण डॉक्टर्स असोसिएशन कडून वारकरी भाविकांची आरोग्य तपासणी संपन्न!

फलटण-श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 निमित्त दि 17 जुलै रोजी फलटण डॉक्टर्स असोसिएशन यांच्या सौजन्याने कणकवंदना हॉस्पिटल प्रांगण फलटण येथे वारीतील वारकरी भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करुण औषधं उपचार व फिजिओथेरपी ची सुविधा देण्यात आली. यावेळी 470 वारकऱ्यांची मोफत तपासणी केली व त्यांना औषधं वाटप केली यामध्ये संघटनेचे कार्यकारणी कमिटी अध्यक्ष डॉ. निनाद दोशी, उपाध्यक्ष डॉ. चेतन गुंदेचा, महिला उप अध्यक्षा डॉ सौं शिल्पा गांधी,सचिव डॉ. निखिल गांधी, खजिनदार डॉ. सागर तेली तसेच प्रसिद्ध तज्ञ डॉ. संजय राऊत, डॉ. जे. टी. पोळ, डॉ विक्रांत रसाळ, डॉ तेजस गांधी, डॉ सौं .राजश्री नाळे, डॉ संतोष गांधी,डॉ अलोक गांधी,डॉ महेश शिंदे, डॉ सौं दिव्या रसाळ,जेष्ठ डॉ सुभाष दोशी डॉ सौं अंकिता गांधी, डॉ सौं सई खराडे, डॉ. किरण शेंडे, फीजिओथेरपीस्ट डॉ समीर खोत व कणकवंदना हॉस्पिटल स्टाफ, ओंमकार भोईटे यांनी शिबिरास उपस्थिती राहून माऊलींसाठी सेवा दिली, शिबिराचे उदघाटन डॉ .संजय राऊत यांनी केले, या शिबिरास श्रीमंत संजीवराजे निंबाळकर (बाबा )माजी अध्यक्ष सातारा जिल्हा परिषद, सातारा यांनी सदिच्छा भेट दिली.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा