NEET पेपरफुटीचा दणका: अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; साखरवाडीत युवा वर्गाकडून फटाके फोडून जोरदार जल्लोष!

नितीन जगताप 
साखरवाडी (ता. फलटण): गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या NEET आणि इतर परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आज साखरवाडी (ता. फलटण) येथे स्थानिक युवा वर्गाने एकत्र येत फटाक्यांची आतिशबाजी केली आणि जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला.

'झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिये!
'देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या पेपरफुटी घोटाळ्याविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर विद्यार्थी संघटना आणि 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या (CJP) माध्यमातून सलग २८ दिवस तीव्र आंदोलन सुरू होते. अखेर सरकारला नमवून शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची बातमी समजताच साखरवाडी येथील मुख्य चौकात युवकांनी एकच गर्दी केली होती. "विद्यार्थी एकता जिंदाबाद" अशा घोषणा देत तरुणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

ग्रामस्थ आणि तरुणांची मोठी उपस्थिती:
साखरवाडी येथे आयोजित या विजयोत्सवाच्या वेळी सचिन (बबलू) बारगळे, सागर माने, सागर सरतापे, मयुर पवार, ओंकार भोसले, पिंटू मदने, राकेश निंभोरे, धनराज जाधव, विशाल मोरे, दादा जाधव, गौतम माघाडे, मयूर सोनवणे, विनोद सरतापे, शुभम दरेकर, सोनू आगवणे, बाळू खुंटे, अर्जुन मोरे यांच्यासह गावातील अनेक तरुण, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"हा लढा केवळ दिल्लीपुरता मर्यादित नव्हता, तर देशातील प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याच्या हक्कासाठी होता. आज युवाशक्तीच्या एकजुटीमुळे दडपशाही करणाऱ्या सरकारला झुकणे भाग पडले आहे," अशी भावना यावेळी उपस्थित तरुणांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा