JEE Main व NEET-UG परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या स्वराली वेदपाठकचा सत्कार*


 : JEE Main 2026 आणि NEET-UG 2026 या दोन्ही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण प्रवेश परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या स्वराली निरंजन वेदपाठक हिचे तिच्या राहत्या घरी धुळदेव येथे जाऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी स्वरालीसह तिच्या आई-वडिलांचेही मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या आनंदात सहभागी होत शुभेच्छा देण्यात आल्या.स्वरालीने JEE Main 2026 सत्र 1 परीक्षेत 97.3886340 NTA स्कोअर प्राप्त केला आहे. तसेच NEET-UG 2026 परीक्षेत 720 पैकी 547 गुण मिळवत 97.9929946 पर्सेंटाइल प्राप्त केली असून, तिची NEET ऑल इंडिया रँक 40,123 आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठीच्या या दोन्ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये तिने मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमानशेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय धुळदेव चे स्वरालीचे माजी शिक्षक तथा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी येथील प्रयोगशील, उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक आयु. बाबासाहेब जगताप, कै. मल्हारराव सस्ते हायस्कूल, सस्तेवाडीचे प्रयोगशील व उपक्रमशील शिक्षक बजरंग गायकवाड सर, प्रगत शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे सर तसेच सामाजिक कार्यकर्ते आयु. आनंद जगताप सर यांनी स्वरालीच्या राहत्या घरी जाऊन तिचे व तिच्या आई-वडिलांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.यावेळी स्वरालीचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मिठाई भरवून तिच्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला. उपस्थितांनी स्वरालीच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत तिच्या जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेचे कौतुक केले.आई-वडिलांचे प्रेम व पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वरालीने घेतलेली विशेष मेहनत यांच्या जोरावर तिने मिळविलेले हे यश विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर मोठे यश संपादन करता येते, याचे स्वराली वेदपाठक हिचे यश हे उत्तम उदाहरण ठरले आहे.यावेळी स्वरालीचे शिक्षक बाबासाहेब जगताप सर यांनी स्वरालीच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील जुन्या आठवणी सांगून तिच्यामधील जिज्ञासा, यश संपादन करण्यासाठी तिने प्राथमिक वर्गापासूनच घेतलेली कठोर मेहनत व जिद्दीचे कौतुक केले. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन स्वराली मध्ये असणाऱ्या गुणांचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा