क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे व प्राथमिक शाळा सरडे गावठाण मध्ये भक्तिभावात संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा संपन्न
सरडे, 17 जुलै 2026* क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे येथे आज _श्री संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याचे_ मोठ्या भक्तिभावात आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संस्कृती आणि परंपरेचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर व्हावेत तसेच त्यांच्यामध्ये विविध मूल्ये रुजावीत या उद्देशाने हा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती या सोहळ्याचे प्रास्ताविक करणारे शाळेचे क्रीडाशिक्षक _श्री आप्पासाहेब वाघमोडे_ यांनी दिली. सर्व शिक्षकांच्या नियोजनाखाली संपूर्ण सोहळा पार पडला.सोहळ्याची आरती _युथ असोसिएशन संस्थेचे चेअरमन श्री शत्रुघ्न बेलदार_, _प्राथमिक शाळा सरडे गावठाण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अशोक बेलदार_, _हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अनिल खलाटे सर_ आणि _प्राथमिक शाळेचे श्री. गावडे सर_ यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.या प्रसंगी दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थांनी विठ्ठल रुक्माई तसेच संत ज्ञानेश्वर यांचे पोशाख परिधान करून सोहळ्याची शोभा वाढविली क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी टाळाच्या नादात ज्ञानोबा तुकाराम असा जे घोष केला इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी _वारकरी वेशभूषेत_ सहभागी झाले होते. "ज्ञानोबा माऊली तुकाराम" च्या गजरात दिंडीने सरडे गावठाणात प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी _श्री सचिन बेलदार यांचा अश्व_ हे विशेष आकर्षण ठरले. _सरडे गावातील ग्रामस्थांनी दिंडीचे आपल्या घरासमोरील अंगणात रांगोळी घालून स्वागत केले. यामध्ये श्री सत्यवान उपाळे कुटुंबीयांनी अंगणात विशेष आकर्षक रांगोळी व जनाबाई उत्कृष्ट असा देखावा सादर करून स्वागत केले._दिंडीच्या सांगतेनंतर शाळेच्या मैदानावर हायस्कूल व प्राथमिक शाळेतील मुलींनी तसेच गावातील महिला व महिला शिक्षिकांनी _फुगडीचा पारंपारिक डाव_ सादर केला. शेवटी सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष भोजन देण्यात आले.सोहळ्याची सांगता _युथ असो. संस्थेचे सदस्य श्री. जयप्पा बेलदार_ यांच्या हस्ते आरतीने झाली.*वार्ताहर: सरडे* *ज्ञानोबा माऊली तुकाराम!* 🚩---
Comments
Post a Comment