सरडे गावातील निविदा प्रक्रियेत ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासकीय सरपंचांनी पारदर्शकता राखावी; ग्रामस्थांची आग्रही मागणी!


२२ जुलै ही निविदा भरण्याची शेवटची मुदत; २३ जुलै रोजी लिफाफे उघडणार, 

सरडे (प्रतिनिधी):
फलटण तालुक्यातील मौजे सरडे ग्रामपंचायत हद्दीतील तांडावस्ती सुधार योजना २०२५-२६ अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी मागवण्यात आलेल्या निविदेवरून सध्या गावात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. सदर कामासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, २२ जुलै २०२६ ही निविदा जमा करण्याची अंतिम तारीख आहे. तर २३ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात बंद लिफाफे उघडण्यात येणार आहेत. मात्र, प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेत ठेवण्यात आलेल्या काही अटी व पारदर्शकता नसल्याच्या भीतीमुळे ग्रामस्थांमधून तीव्र सवाल उपस्थित केले जात आहेत.

ही निविदा प्रक्रिया शासनाच्या नियमांमध्ये बसते का ..? हे पाहणे महत्वाचे आहे का  संबंधातील लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न तर नाही ना..? 

 जाहीर निविदेतील कामाचा तपशील:
 कामाचे नाव: मौजे सरडे येथील चव्हाणवस्ती येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (ता. फलटण, जि. सातारा)
  अंदाजित पत्रकीय रक्कम (अं.प.र.): रु. १०,००,०००/-
  निविदा रक्कम / बयाणा रक्कम: रु. ८,४०,५५५/- | बयाणा: रु. ८,४०५/- (१%)
  मुदत & अंतिम दिनांक: ६ महिने | निविदा जमा करण्याची मुदत: २२/०७/२०२६ (सायंकाळी ५:०० वा. पर्यंत)

निविदा सूचना पत्रकात दिलेला मुद्दा क्रमांक ४ यावर नागरिकांनी व इच्छुक ठेकेदारांनी विशेष बोट ठेवले आहे. यामध्ये "दिनांक २३/०७/२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता निविदा उघडण्यात येतील, परंतु सदर दिवशी निविदा उघडणे शक्य नसल्यास कार्यालयाच्या वेळेच्या सोयीनुसार उघडण्यात येतील," असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे संबंधित ठेकेदारांना व ग्रामस्थांना निश्चित वेळ कळणे कठीण झाले आहे. जर वेळ अनिश्चित ठेवली तर पारदर्शकता कशी राहणार? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य व निश्चित वेळ जाहीर करावी, जेणेकरून पारदर्शक वातावरण राहील, अशी मागणी होत आहे.
नागरिकांचा सवाल – मुद्दा क्र. ५ आणि ऐनवेळी निविदा रद्द करण्याचे अधिकार:
प्रसिद्धी पत्रकातील मुद्दा क्रमांक ५ नुसार "कोणतेही कारण न दाखवता एक किंवा सर्व निविदा उघडण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार" अधिकाऱ्यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे. यावर एका जागरूक नागरिकाने तीव्र आक्षेप नोंदवला असून, "जर कोणती निविदा रद्द करण्यात आली किंवा उघडली गेली नाही, तर त्याचे स्पष्ट कारण लोकांसमोर आलेच पाहिजे! प्रशासनाने कारणाशिवाय निविदा रद्द करू नये," असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

दिग्गज ठेकेदारांची स्पर्धा, पण कोणाला मिळणार काम? शासकीय नियमय अटी  निविदा प्रसिद्धी किंवा  देता येते का ..? 

गावातील या १० लाख रुपयांच्या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामासाठी अनेक दिग्गज व अनुभवी ठेकेदार उतरण्याच्या तयारीत असून चांगल्या दर्जाचे काम व्हावे अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. मात्र, ऐनवेळी बंद लिफाफ्यात कोणता निर्णय होतो आणि काम कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पेपर प्रसिद्धीचा खर्च कोणाच्या खिशातून?.

या संपूर्ण निविदा प्रक्रियेदरम्यान वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली बातमी/जाहिर निविदा कोणाला विचारून दिली गेली, कोणत्या पेपर मध्ये दिली आणि त्याचा खर्च कोणाच्या खिशातून झाला, शासनाच्या परिपत्रक नुसार ही निविदा आहे का..? जाहिरात खर्च करता येतो का .? या विषयावरही गावात चर्चांना उधाण आले आहे. या खर्चाचा हिशोब व खुलासा काही जागरूक नागरिक लवकरच प्रशासनाकडे मागणार असल्याचे बोलले जात आहे.
सर्वसमावेशक निर्णयाची मागणी:
सरडे गावातील यापुढील सर्व विकासकामे आणि प्रशासकीय निर्णय हे सर्व ग्रामस्थांना व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच पारदर्शक पद्धतीने केले जावेत, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासकीय सरपंच यांनी कोणत्याही दबावाला न बळी पडता ही निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक मार्गाने पार पाडावी, अशी जनभावना व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा