क्रांतिसिंह नाना पाटील यांची 126 वी जयंती उत्साहात साजरी*
*सरडे ता. फलटण* : क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांची _126 वी जयंती_ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक _श्री दादासाहेब एजगर सर_ यांनी केले. प्रस्ताविकेत त्यांनी नाना पाटील यांना _शेतकऱ्यांचे कैवारी, तुफान सेनादलाचे संस्थापक, देशभक्तीचे प्रेरणास्थान, जीवनाला दिशा देणारे दीपस्तंभ, मराठीचा अभिमान आणि स्वातंत्र्याचा महान योद्धा_ अशा शब्दांत आदरांजली वाहिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी _युथ असोसिएशन संस्थेचे माजी चेअरमन श्री विठ्ठल कुशाबा बेलदार_ तर प्रमुख पाहुणे म्हणून _संस्थेचे संस्थापक सचिव श्री हनुमंतराव एजगर सर_ उपस्थित होते. याप्रसंगी _युथ असोसिएशनचे विद्यमान चेअरमन श्री शत्रुघ्न बेलदार_ यांची देखील उपस्थिती लाभली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी _श्री हरिश्चंद्र करडे, श्री सुखदेव बेलदार, श्रीमती कांचनताई पाटील_ तसेच शाळेचे मुख्याध्यापक _श्री अनिल खलाटे सर_ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूज...