फलटण मुक्कामी वारकऱ्यांना 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटने'कडून बिस्कीट आणि पाणी बॉटल वाटप!
फलटण (प्रतिनिधी):
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज फलटण येथे आगमन झाले असून, या सोहळ्यातील वारकरी भाविकांच्या (माऊलींच्या) सेवेसाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेच्या' वतीने ग्लुकोज बिस्कीट आणि बिस्लेरी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी दरवर्षी अनेक सामाजिक संस्था पुढे येत असतात. याच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत, फलटण मुक्कामी आलेल्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना प्रवासाच्या थकव्यात आणि उन्हाच्या त्रासापासून दिलासा मिळावा, या हेतूने रिक्षा संघटनेच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. यावेळी हजारो वारकऱ्यांना अत्यंत आपुलकीने पाणी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
या मान्यवरांची लाभली उपस्थिती:
या सेवाभावी उपक्रमाचे नियोजन आणि वाटप करताना संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
दिनेश अहिवळे (अध्यक्ष, रिक्षा संघटना) संजयभाऊ मोरे,सनी कदम,दादा अहिवळे,महेंद्र काकडे
बाळु मोरे,हरिदास अहिवळे,विशाल अहिवळे,पिंटु अहिवळे,
काळु अहिवळे (अध्यक्ष, रिक्षा संघटना भीम जयंती उत्सव)
तात्या मोरे,निलेश अहिवळे
हरिश काकडे,या सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने वाटप पूर्ण केले. रिक्षा संघटनेच्या या अनोख्या आणि सेवाभावी उपक्रमाचे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसह स्थानिक नागरिकांकडून अत्यंत कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment