खटकेवस्तीचे सुपुत्र हर्षद साळुंखे यांची 'ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल'च्या उपप्राचार्यपदी निवड; गावात आनंदाचे वातावरण
प्रतिनिधी
फलटण: खटकेवस्ती गावचे सुपुत्र आणि अत्यंत हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्त्व लाभलेले श्री. हर्षद ज्योतिराम साळुंखे यांची मोरुची येथील 'डॉ. नितावेज् ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल'च्या उपप्राचार्य (Vice Principal) पदी निवड झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संस्थेने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.हर्षद साळुंखे हे त्यांच्या कष्टाळू आणि हुशार स्वभावासाठी परिसरात ओळखले जातात. त्यांच्या या यशाने खटकेवस्ती गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावकरी आणि मित्रांनी त्यांच्या कष्टाचे कौतुक करत, " मेहनत आज खऱ्या अर्थाने फळाला आली आहे. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमधील तुझा हा पुढील प्रवास यशस्वी होवो," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.या नव्या जबाबदारीबद्दल हर्षद साळुंखे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा शैक्षणिक दर्जा आणखी उंचावेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment