फलटण येथे 'बार्टी'च्या संविधान दिंडीचे उत्साहात स्वागत;
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, व पोलिस उपअधीक्षक धान्यकुमार गोडसे यांच्या हस्ते उद्घाटन!
फलटण ...संविधानाचा जागर व उद्देशिकेचे सामूहिक वाचनफलटण:डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने समता दूत प्रकल्पाच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही 'संविधान दिंडी'चे आयोजन करण्यात आले आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करणारी ही संविधान दिंडी आज, १७ जुलै रोजी फलटण शहरात दाखल झाली. फलटणकरांनी या दिंडीचे अत्यंत उत्साहात आणि भक्ती-भावाच्या वातावरणात स्वागत केले.फलटण नगरपरिषदेसमोरील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान दिंडीचे आगमन झाले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रस्तावना) सामूहिक रित्या वाचन करून लोकशाहीच्या मूल्यांचा जागर केला.विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थितीया सोहळ्याला फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, धन्यकुमार गोडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) , भीमजयंती सोहळा समितीचे अध्यक्ष हरीश काकडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव गायकवाड, रिपाईचे ज्येष्ठ नेते विजय येवले, संजय निकाळजे, राजाभाऊ भारुड, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका सुवर्णाताई अहिवळे, नगरसेविका मीनाक्षीताई काकडे, सुरज अहिवळे, तानाजी जगताप, मनोज काकडे, पत्रकार गोविंद मोरे, सूरज भैलुमे , निखिल साबळे यांसह विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
"संविधान हा आपल्या देशाचा आत्मा असून, त्याचे विचार घराघरांपर्यंत पोहोचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे."
— उपस्थित मान्यवरांचे प्रतिपादन
'बार्टी'कडून मान्यवरांचा सन्मान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले होते.
इतर मान्यवरांना 'संविधान प्रत' आणि 'संविधान ट्रॉफी' (स्मृतीचिन्ह) देऊन सन्मानित करण्यात आले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
संविधानाचा संदेश जनमानसात पोहोचवणाऱ्या या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी फलटण तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाचे महत्त्व आणि मानवी जीवनातील त्याचे स्थान याविषयी आपली विचारप्रवृत्त करणारी मनोगते व्यक्त केली.दिवसभर प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मांदियाळीसमता दूत प्रकल्पाचे अधिकारी श्री. राहुल गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली समता दूत टीम आज दिवसभर फलटण शहरात तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवणार आहे. यामध्ये नागरिकांमध्ये संविधानाविषयी जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी 'प्रश्नमंजुषा' आणि 'चालता बोलता' यांसारखे नाविन्यपूर्ण व संवादात्मक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळातील जनमानसापर्यंत संविधानाचा संदेश पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बार्टीच्या समता दूतांकडून केले जात आहे.
Comments
Post a Comment