संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त बडेखान येथे १७ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी भव्य अल्पोपहार सेवा संपन्न
साखरवाडी:आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी माऊलींच्या सेवेसाठी ‘श्री. ग. वि. भोसले प्रतिष्ठान, साखरवाडी, यांच्या वती सलग तिसऱ्या वर्षी भव्य अल्पोपहार (नाश्ता) व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी बडेखान येथे पहाटे ५ वाजल्यापासून हजारो वारकरी भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला.
आळंदी ते पंढरपूर अशा पायी वारीत मैलोन्मैल चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी, या उद्देशाने ग. वि. भोसले प्रतिष्ठान दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करते. या वर्षीही बडेखान परिसरामध्ये पहाटेपासूनच वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत करून त्यांना अल्पोपहार व चहा-पाण्याचे वाटप करण्यात आले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.या यशस्वी आयोजनासाठी श्री. ग. वि. भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सचिन भोसले, उपाध्यक्ष श्री. संजय भोसले, सचिव श्री. हरिदास सावंत (सर), सदस्य श्री. अमोल भोसले आणि साखरवाडी परिसरातील विविध समाजसेवी संस्था व नागरिकांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे वारकरी बांधव आणि सर्वसामान्य जनतेकडून भरभरून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment