बॅनरबंदी झुगारून फलटण शहरात 'बॅनरबाजी'; मुख्याधिकाऱ्यांची परवानगी की मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नावाचा गैरवापर? नागरिकांमध्ये चर्चांना उधाण!

फलटण:
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात प्रशासनाने कडक बॅनरबंदी लागू केली असतानाही, मुख्य चौकाचौकांत लागलेल्या अनधिकृत बॅनरमुळे शहरात सध्या उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फलटण तालुक्यात विविध जयंती आणि सण-उत्सवांच्या काळातही कधी न दिसलेली 'बॅनरबाजी' या माऊलींच्या पालखी सोहळ्यात काही ठराविक लोकांकडून पाहायला मिळत असल्याने नागरिकांमधून संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत.
पालखी सोहळ्याच्या मुख्य मार्गावर आणि शहराच्या महत्त्वाच्या चौकांमध्ये काही ठराविक व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावले आहेत. या पार्श्वभूमीवर, "शहरात बॅनरबंदी असताना या बॅनरला मुख्याधिकाऱ्यांनी अधिकृत परवानगी दिली आहे की काय?" असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत. जर प्रशासनाने परवानगी दिली नसेल, तर या अनधिकृत बॅनरवर नगरपालिकेकडून अद्याप कारवाई का झाली नाही, याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नावाचा वापर?

या संपूर्ण प्रकारात आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. फलटण तालुक्याच्या विकासासाठी आणि विविध लोकहितार्थ कामांमध्ये नेहमीच अग्रभागी राहणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा) यांच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर काही लोक स्वतःच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी आणि स्वार्थासाठी करत आहेत का, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. माजी खासदार दादांच्या लोकप्रियतेचा आणि वजनाचा आडोसा घेऊन, प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी तर ही बॅनरबाजी केली जात नाही ना? असाही सूर आता जनतेतून निघत आहे.
एकीकडे प्रशासन नियम पाळण्याचे आवाहन करत असताना, दुसरीकडे काही ठराविक लोकांकडून नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, या अनधिकृत बॅनरवर कारवाई होणार की तालुक्यातील जनतेला बॅनर लावण्याची कायमस्वरूपी बंदी उठवणार..? प्रशासनाचे याकडे डोळेझाक राहणार..? याकडे आता संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा