प्रा. रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी
फलटण प्रतिनिधी लेखणीच्या सामर्थ्यावर समाजप्रबोधन, सामाजिक न्याय आणि लोकहिताची चळवळ उभी राहू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रा.रमेश आढाव यांची पत्रकारिता होय. पत्रकारितेला लोकसेवेचे प्रभावी माध्यम मानत त्यांनी समाजातील विविध घटकांच्या समस्या सातत्याने मांडल्या. वंचित, उपेक्षित आणि अन्यायग्रस्तांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेत आदर्श पत्रकारितेचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या स्मरणार्थ गरजू विद्यार्थ्यांना एक लाख वह्यांचे मोफत वाटप करण्याचा आढाव कुटुंबीयांनी घेतलेला संकल्प प्रेरणादायी आहे, असे मत कै.भाऊसाहेब दैठणकर प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुपुत्र बंडी यांनी व्यक्त केले. महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन म्हणून शालेय साहित्य वाटप व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन निंभोरे (ता. फलटण) येथील प्राथमिक शाळेत करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शाळेचे अधीक्षक अनिल महामुनी, मोहनराव माळवे, दस्तगीर पठाण, संजय इंगळे, चंदाराणी जगताप यांच्यासह आढाव ...