फलटण नगरपालिकेच्या आरोग्य सभापतींना उपोषणकर्त्यांचा विसर? नगराध्यक्ष व सभापतींच्या भूमिकेवर प्रश्न..? अक्षय तावरे
मुख्याधिकारी निखिल जाधव गोरक्षकांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अन्यथा आत्महत्या करू - सौरभ सोनवणे केवळ मतांच्या राजकारणासाठी लोकप्रतिनिधींनी या संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष..? फलटण (प्रतिनिधी): फलटण नगरपालिकेच्या मालकीचा बेकायदेशीररीत्या सुरू असणारा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस उजाडला आहे. मात्र, चार दिवस उलटूनही पालिका प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी याची कोणतीही दखल न घेतल्याने शिवसेना/गोरक्षक अक्षय तावरे यांनी पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघाती टीका केली आहे. "मुख्याधिकारी कामाच्या बाबतीत 'दिसायला दांडगा अन् कामाला उंडगा'" असे बोलले आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा करण्याची तसदी घेतलेली नाही. यावर संताप व्यक्त करत अक्षय तावरे म्हणाले की, "मुख्याधिकारी केवळ दिसायला सक्षम असून कामाच्या बाबतीत मात्र 'दिसायला दांडगा आणि कामाला उंडगा' अशी त्यांची अवस्था आहे." पालिका प्रशासन संवेदनशीलतेचा पूर्णपणे अभाव दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी ...