फलटण तहसील कार्यालय परिसरात उभ्या गाडीवर झाड कोसळले; वाहनाचे मोठे नुकसान!
मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत दररोज प्रशासकीय कामासाठी येणारे नागरिक व कर्मचारी आपली वाहने पार्क करतात. नेहमीप्रमाणे आज तेथे पार्क केलेल्या एका वाहनावर अचानक एक जुने व धोकादायक बनलेले झाड मोठ्या फांद्यांसह कोसळले. झाड पडल्याचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
झाड थेट गाडीच्या बोनेट टपावर पडल्यामुळे गाडीचा नुकसान झाले आहे. सुदैवाने, झाड कोसळले त्या क्षणी गाडीत किंवा गाडीच्या शेजारी कोणीही उपस्थित नव्हते, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
तहसील कार्यालय आवारात अनेक जुनी, वाळलेली व धोकादायक झाडे उभी आहेत. याची पाहणी करून झाडे अपघातास कारणीभूत ठरू शकतात ती काढून टाकावीत , संबंधित विभागाने वेळेत छाटणी का केली नाही? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करण्याचे काम सुरू लवकर करावे .
तसेच, तहसील कार्यालय परिसरातील सर्व धोकादायक झाडांची तत्काळ छाटणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
Comments
Post a Comment