जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदासाठी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांना संधी द्या: पूर्व भागातील सर्व समाजातील नागरिकांची मागणी

जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा पूर्व भागाचा चेहरा ...विश्वासराव भोसले

जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदासाठी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांना संधी द्या: पूर्व भागातील सर्व समाजातील नागरिकांची मागणी

सातारा:
रायगड जिल्ह्यात राज्यस्तरीय यशवंत अभियानात शासनाने व पंतप्रधानांनी विशेष उपक्रमासाठी गौरवलेले, श्री विश्वासराव भोसले माजी सनदी अधिकारी यांची सातारा जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदावर भारतीय जनता पार्टीने नियुक्ती द्यावी, अशी जोरदार मागणी सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील नागरिकांमधून केली जात आहे. एक अनुभवी आणि निवृत्तीनंतर देखील सतत सामाजिक तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे, यांच्या गावाची तालुक्यातून मुख्यमंत्री अभियानामध्ये निवड झाली, अशा अधिकाऱ्यास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही संधी दिल्यास जिल्ह्याच्या विकासाला एक वेगळी गती मिळेल, असा विश्वास सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
विश्वासराव भोसले यांनी आपल्या प्रशासकीय सेवाकाळात रायगड जिल्हा परिषदेमध्ये कुपोषण मुक्त रायगड, टँकर मुक्त रायगड आणि तंटामुक्त रायगड म्हणून विशेष कार्य केले आहे.. तसेच राज्यात विविध विभागात उल्लेखनीय आणि ध्येयधोरणात्मक काम केले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रशासनाचा दांडगा अनुभव, राजकीय व सामाजिक प्रश्नांची सखोल जाण आणि लोकांच्या प्रश्नांवर तात्काळ मार्ग काढण्याची क्षमता असणारे नेतृत्व म्हणून त्यांची पूर्व भागात विशेष ओळख आहे..केवळ प्रशासकीय क्षेत्रातच नव्हे, तर सहकार व कृषी क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे.. श्रीराम सहकारी साखर कारखान्यात कोणत्याही पदावर नसतानाही त्यांनी हजारो शेतकऱ्यांचे व सभासदांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकरी आणि सभासदांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या निकाली काढण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. त्यामुळेच पूर्व भागातील शेतकऱ्यांचा 'बुलंद आवाज' आणि अत्यंत विश्वासाचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते..तळागाळातील सामान्य जनतेच्या अडचणींची खडान् खडा माहिती असणाऱ्या आणि लोकांसाठी सातत्याने धावून जाणाऱ्या विश्वासराव भोसले यांच्यासारख्या कार्यक्षम माजी अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळावी, अशी जनभावना आहे..*
*ते दिशा समितीवर असताना दोन वर्षांमध्ये जिल्हा प्रशासनाने आणि वरिष्ठांनी त्यांचे कार्य जवळून पाहिले आहे.. मात्र डायनामिक पद्धतीने व प्रशासकीय अनुभवावरून विकासाची दिशा बदलणाऱ्या, व प्रशासकीय कार्यकाळापासून भाजपाचे कार्य करणाऱ्या, जुन्या व अनुभवी कार्यकर्त्यास अध्याप भाजपाने का संधी दिली नाही..! याबाबत देखील उलट सुलट चर्चा सर्वत्र चालू आहे.. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सर्वांच्या मागणीचा विचार करून भोसले साहेब यांना स्वीकृत सदस्य तसेच चांगल्या महामंडळावर संधी द्यावी, अशी राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा