फलटण मध्ये ‘नवीन राजकारणाचा चेहरा’ सचिन अटक यांचा ४५ वा वाढदिवस धुमधडाक्यात; ४५ केक कापून कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह!
फलटण / प्रतिनिधी:
फलटण तालुक्यातील कोळकी येथील स्थानिक राजकारणात 'नवीन राजकारणाचा चेहरा' म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत नवयुग तरुण गणेश उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व युवा नेते सचिन अटक यांचा ४५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांनी एकाच वेळी तब्बल ४५ केक कापून आपल्या लाडक्या नेत्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
या वाढदिवस सोहळ्याला कोळकी आणि परिसरातील नागरिक, युवक, महिला वर्ग तसेच सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थितांनी सचिन अटक यांना भावी राजकीय व सामाजिक प्रवासासाठी उदंड आयुष्या शुभेच्छा दिल्या.
जनसेवेचा आणि नव्या नेतृत्वाचा ध्यास
गेल्या काही वर्षांत कोळकी व संपूर्ण फलटण परिसरातील विविध सामाजिक प्रश्न, युवकांच्या रोजगाराचे विषय आणि स्थानिक समस्या धसास लावण्यासाठी सचिन अटक यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. अन्यायाविरुद्ध परखड आवाज उठवणारे आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी "कोळकी ग्रामपंचायत - नवीन राजकारणाचा चेहरा" ही संकल्पना मांडत या भव्य सोहळ्याचे नियोजन केले होते.
ढोल-ताशांचा गजर आणि भव्य आतषबाजी
सचिन अटक यांनी ४५ व्या वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधून ४५ केक कापण्यासोबतच भव्य आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. कार्यकर्त्यांचा उत्साह या वेळी ओसंडून वाहत होता.
आपल्या सत्काराला उत्तर देताना सचिन अटक म्हणाले, "जनता आणि कार्यकर्त्यांचे हे अथांग प्रेमच माझी खरी ताकद आहे. कोळकीसह संपूर्ण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन."
या सोहळ्याप्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रांतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment