फलटण नगरपालिकेच्या आरोग्य सभापतींना उपोषणकर्त्यांचा विसर? नगराध्यक्ष व सभापतींच्या भूमिकेवर प्रश्न..? अक्षय तावरे

मुख्याधिकारी निखिल जाधव गोरक्षकांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अन्यथा आत्महत्या करू - सौरभ सोनवणे

केवळ मतांच्या राजकारणासाठी लोकप्रतिनिधींनी या संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष..?

फलटण (प्रतिनिधी):
फलटण नगरपालिकेच्या मालकीचा बेकायदेशीररीत्या सुरू असणारा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस उजाडला आहे. मात्र, चार दिवस उलटूनही पालिका प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी याची कोणतीही दखल न घेतल्याने शिवसेना/गोरक्षक अक्षय तावरे यांनी पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघाती टीका केली आहे.
"मुख्याधिकारी कामाच्या बाबतीत 'दिसायला दांडगा अन् कामाला उंडगा'" असे बोलले आहे.

 मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा करण्याची तसदी घेतलेली नाही. यावर संताप व्यक्त करत अक्षय तावरे म्हणाले की, "मुख्याधिकारी केवळ दिसायला सक्षम असून कामाच्या बाबतीत मात्र 'दिसायला दांडगा आणि कामाला उंडगा' अशी त्यांची अवस्था आहे." पालिका प्रशासन संवेदनशीलतेचा पूर्णपणे अभाव दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तावरेंनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कत्तलखान्यामध्ये ईटीपी (ETP) प्लांट नसल्याने तो बंद करण्याचे आदेश स्वतः मुख्याधिकाऱ्यांनी काढले होते. असे असतानाही प्रत्यक्ष कारवाई न करता गेल्या तीन महिन्यांपासून केवळ "अहवाल आल्यावर कारवाई करू" अशी उत्तरे देऊन वेळ काढूपणा केला जात आहे.
आरोग्य सभापतींना उपोषणकर्त्यांचा विसर? नगराध्यक्ष व सभापतींच्या भूमिकेवर प्रश्न
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तावरे यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष समशेरदादा नाईक निंबाळकर, आरोग्य समिती सभापती व नगरसेवक सचिन अहिवळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची विचारपूस करणे गरजेचे होते. मात्र, केवळ मतांच्या राजकारणासाठी लोकप्रतिनिधींनी या संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला.

"जनतेच्या करातून पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी कसाईंच्या हितापेक्षा फलटणच्या जनतेच्या आरोग्याचा व कायद्याचा विचार करावा," असा टोला लगावत तावरे यांनी प्रशासनाला कॅमेऱ्यासमोर येऊन समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. प्रशासनाने तातडीने कत्तलखाना बंद करून ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही  त्यांनी एका यू ट्यूब चॅनेल माध्यमातून बोलताना सांगितले  आहे.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा