श्रीमंत नवयुवक तरुण गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आवाहल पुस्तक पूजन व नवीन पावती पुस्तकाचा शुभारंभ
फलटण:
श्रीमंत नवयुवक तरुण गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष धार्मिक व संघटनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवर, मंडळाचे अध्यक्ष आणि उत्साही तरुण कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होती. नवीन पावती पुस्तकाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. तसेच, परंपरेनुसार जुन्या पावती पुस्तकाचे कृतज्ञतापूर्वक पुस्तक पूजन आवाहाल सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.
गणेशोत्सवाच्या तयारीला गती
आगामी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी मंडळाच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात येणार आहे. कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांच्या हस्ते जुन्या पावती पुस्तकाचे पूजन करून नवीन पावती पुस्तकाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे मंडळाच्या वर्गणी संकलन व उत्सव नियोजनाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.
मंडळाचे पदाधिकारी व नागरिक
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करत गणेशोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.वार्षिक अहवाल २०२५-२०२६ सन २०२६ चे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष : श्री. सचिन (दादा) अटक
अध्यक्ष श्री. विनोद चव्हाण ,
श्री. अमित चौधरी उपाध्यक्ष श्री. निलेश दोशी सचिव श्री. युगंधर मोहिते उपसचिव श्री. अनिल बेलदार पाटील श्री. विश्वजित काळे खजिनदार तसेच, मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या साथीने यंदाचा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध, भव्य आणि उत्साही वातावरणात साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजराने परिसर दुमदुमून टाकला.
Comments
Post a Comment