सांगवीत मोरे सरपंचांचा दरारा अन् माणुसकीचा झरा!"चुकीला माफी नाही, विकासात तडजोड नाही" – विरोधकांचे खोडसाळ प्रयत्न अपुरे
सांगवी (विशेष प्रतिनिधी):
"चुकीला माफी नाही आणि विकासकामांत चुकीचं काही करायचं नाही... आपल्याला कोणी छेडलं तर सोडायचं नाही!" याच रोखठोक आणि बाणेदार वृत्तीने सांगवी ग्रामपंचायतीचा कारभार हाकणारे सनी मोरे सरपंच सध्या एका बाजूला कडक शिस्त आणि दुसऱ्या बाजूला माणुसकीचा झरा म्हणून ओळखले जात आहेत. गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे धडाक्याने केली असताना, काही विघ्नसंतोषी नागरिकांकडून मात्र नाहक त्रास दिला जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.
सनी मोरे सरपंचांनी पदभार स्वीकारल्यापासून सांगवी गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. रस्ते, पाणी, वीज, आणि स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावत त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. नियमाला धरून काम करणे आणि चुकीच्या गोष्टींना थारा न देणे ही त्यांची कार्यशैली आहे. अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहणे आणि गावात शिस्त राखणे यांमुळे त्यांचा एक वेगळाच दरारा निर्माण झाला आहे.
मातीशी नातं अन् माणुसकीची जपवणूक
एकीकडे प्रशासकीय कामात कडक शिस्त असली, तरी दुसऱ्या बाजूला गोरगरीब, वृद्ध आणि गरजूंसाठी सरपंचांचे हात सदैव मदतीसाठी पुढे असतात. गावातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणाऱ्या सनी मोरे सरपंचांचा 'माणुसकीचा झरा' प्रत्येक सांगवीकराने अनुभवला आहे.
काही नागरिकांकडून नाहक त्रास; पण विकास थांबणार नाही!
इतके पारदर्शक आणि लोकाभिमुख काम होऊनही, गावातील काही दलाल राजकीय विरोधक वैयक्तिक स्वार्थासाठी विकासकामांत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कामांवर विनाकारण अक्षेप घेणे, दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवणे आणि प्रशासकीय कामात हस्तक्षेप करून त्रास देणे असे प्रकार सुरू आहेत.
मात्र, अशा खोडसाळ वृत्तीला सनी मोरे सरपंचांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे — "गावच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी मी कटिबद्ध आहे. चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालणार नाही आणि कोणी नाहक छेडण्याचा प्रयत्न केला तर गप्प बसणार नाही!"
सांगवीतील सुजाण नागरिक आणि ग्रामस्थ मात्र सनी मोरे सरपंचांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, अशा अडथळे आणणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र निषेध करत आहेत
Comments
Post a Comment