MTS, मंथन व NMMS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


_व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश; गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव_ 

फलटण : कोळकी, फलटण येथील व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी MTS, मंथन तसेच NMMS परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्यास मुधोजी महाविद्यालय, फलटणचे प्रा. डॉ. प्रकाश शिंदे तसेच मौजे चव्हाणवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते हणमंत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

NMMS परीक्षेत प्रांजल दीपक येळे हिने उल्लेखनीय यश संपादन करून व्हिजन अकॅडमीच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर घातली.

मंथन परीक्षेत अक्षरा पखाले, शौर्यराज जगताप, प्रांजल दीपक येळे, राजवर्धन प्रकाश घोंगडे आणि कैवल्य विजय बोरावके यांनी गौरवचिन्ह मिळवून यश संपादन केले.

तसेच MTS परीक्षेत राज मधुकर साळुंखे, शंभूराज शंकर लोंढे, शिवन हनुमंत लोंढे, प्रांजल दीपक येळे, अपेक्षा रामचंद्र मोरे, यश निलेश महाजन, अक्षरा संतोष पखाले, प्रणव प्रकाश शिंदे आणि आरोही रामचंद्र मोरे यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले.

रियांश रुपेश पिसाळ, राजवर्धन रुपेश घोंगडे, कैवल्य विजय बोरावके आणि यशवर्धन अमोल जाधव यांनी ट्रॉफी मिळवून आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे व्हिजन अकॅडमीचे सुशांत घाडगे सर यांच्यासह सहकारी शिक्षक दिपाली पवार, सचिन खरात, अश्विनी कुलाळ आणि मेघा घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल व्हिजन अकॅडमीचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

दरम्यान, प्रा. डॉ. प्रकाश शिंदे यांनी भूगोल विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल व्हिजन अकॅडमीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याची अकॅडमीची परंपरा या निमित्ताने अधोरेखित झाली.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सरावाची संधी दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही विविध स्तरांवर आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात, हे या यशातून स्पष्ट झाले. यावेळी उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करून मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा