कै. संजय गांधी विद्यालय, गुणवरे येथे देशभक्तीच्या जल्लोषात स्वातंत्र्यदिन साजरा; ‘अधिकाऱ्यांचे गाव’ म्हणून विद्यालयाची गौरवशाली वाटचाल
गुणवरे :* प्रतिनिधी कै. संजय गांधी विद्यालय, गुणवरे येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. *डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट, पुणेचे प्रमुख पाहुणे श्री. संकेत शहा* यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट, पुणेचे ट्रस्टी *अमित जंजानी* व *अखिल भंडारी* तसेच ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष रेश्माताई कणसे, उपाध्यक्ष बापूराव गावडे, गुणवरे संस्थेचे सचिव राहुल कणसे सर तसेच गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्या वनिताताई आढाव, पोलीस पाटील अमोल आढाव, पुणे पोलीस मनोज आढाव, हिरामण आढाव, पंचक्रोशीतील विविध मंडळे व संस्थांचे पदाधिकारीसंस्थेचे प्रशासन अधिकारी श्री गावडे सर माजी मुख्याध्यापक श्री कुंभार सर, ग्रामस्थ, पत्रकार राजेंद्र बनसोडे, पत्रकार वैभव गावडे,पत्रकार शशिकांत आढाव, पत्रकार अमोल बागव, तसेच सांगळे सर, जाधव मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. ध्वजारो...