वृक्ष झाले हैराण... उन्हाळा आला की येते आठवण! आबासो खांडेकर
फलटणची भूमी ही संतांच्या आणि शूरवीरांची भूमी म्हणून ओळखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत या परिसराचे तापमान ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता निसर्गाचा कोप होतोय की काय, अशी भीती सरडे गावात वाटू लागली आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली आणि सूर्याने आग ओकायला सुरुवात केली की, आपल्याला अचानक वृक्षांची आणि त्यांच्या गारव्याची आठवण येते. पण प्रश्न हा आहे की, आपण झाडांची आठवण फक्त चटके बसू लागल्यावरच काढायची का? एकेकाळी फलटणच्या आसपास असलेल्या बागा आणि रस्त्यांच्या कडेला असलेली मोठी झाडे आज विकासकामांच्या नावाखाली दिसेनाशी झाली आहेत. फलटण-सातारा किंवा फलटण-पुणे फलटण आसू की राजळे सरडे मार्गावर प्रवास करताना रस्ते रुंदीकरणात अनेक जुने वटवृक्ष आणि कडुनिंब सह अनेक झाडे तोडली गेली. याचा परिणाम आज शहरासह ग्रामीण भागात वाढत्या उष्णतेत स्पष्टपणे जाणवत आहे. सिमेंटची रस्ते नी घरे तापू लागली की आपल्याला त्या जुन्या कौलारू घरांची, तर जुन्या रस्त्यांची आणि अंगणातील त्या मोठ्या लिंबाच्या झाडाची प्रकर्षाने आठवण येते. दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपण सोयीसाठी झाडे तोडली, पण त्या बदल्यात नवीन झाडे...