मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी NDMJ मैदानात! अनुसूचित जातीतील पात्र बचत गटांना विनामूल्य सहकार्य
राज्य सचिव वैभव गीते यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा पुढाकार; अर्ज प्रक्रियेपासून प्रस्ताव सादर करण्यापर्यंत मिळणार मदत फलटण (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र स्वयंसहायता बचत गटांना शासनाच्या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) संघटनेने पुढाकार घेतला आहे. संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर व तालुक्यातील NDMJ पदाधिकारी पात्र नागरिकांना या योजनेसाठी विनामूल्य मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकदा नागरिकांना पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि प्रस्ताव सादर करण्याबाबत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पात्र असूनही काही लाभार्थी योजनांपासून वंचित राहतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन NDMJ संघटनेच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, बचत गटांची पात्रता तपासण्याबाबत मार्गदर्शन करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि संबंधित शासकीय कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याच्या प्रक्रि...