खासदार शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत फलटणमध्ये मोठा मेळावा होणार? सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे नंतर कार्यकर्ता मिळाला..?
सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी महादेव (आप्पा) गायकवाड यांची निवड
कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह!
फलटण:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा, आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच फलटणमध्ये पक्षाचा भव्य मेळावा आणि सामाजिक न्याय विभागाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात शरद पवार साहेबांच्या विचारांची मशाल पेटती ठेवण्यासाठी पक्षाने सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षपदी निष्ठावंत नेतृत्व महादेव (आप्पा) राजेंद्र गायकवाड यांची धडाकेबाज निवड केली आहे.
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते महादेव आप्पांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. रविवार पेठ, फलटणचे सुपुत्र असलेले महादेव गायकवाड हे पदासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने समाजाच्या आणि कामगारांच्या हितासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
शरद पवार साहेबांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचा संकल्प!
पक्षाध्यक्ष शरद पवार साहेबांनी नेहमीच बहुजन, वंचित आणि कामगार घटकांच्या हक्कासाठी संघर्ष केला आहे. तोच पुरोगामी विचार तालुक्यातील घराघरांत आणि तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आता महादेव गायकवाड यांच्याकडे दिली आहे .सामाजिक कार्यकर्ते कै.नंदकुमार मोरे यांची उणीव भरून काढण्यासाठी
शरद पवार साहेब फलटण तालुक्यात उपस्थितीत राहून फलटणमध्ये मोठा मेळावा घेणार असल्याच्या चर्चा होत आहे ?
Comments
Post a Comment