महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत सातारा येथील शासकीय वसतिगृहात वृक्षरोपण

सातारा:
महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण, सातारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील शासकीय मुले व मुलींच्या वसतिगृहाच्या आवारात उत्साहात वृक्षरोपण कार्यक्रम पार पडला.
पर्यावरणाचा समतोल राखणे, परिसर हिरवागार आणि प्रसन्न ठेवणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वसतिगृहाच्या आवारात विविध प्रकारच्या फळझाडांची व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमास मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षक पाटील मॅडम, मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक गायकवाड साहेब आणि बार्टीचे समतादूत सागर काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना उपस्थितांनी केवळ झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
या वृक्षरोपण प्रसंगी वसतिगृहातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्व विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा