फलटण शहरात १६ ऑक्टोबरपासून २०% पाणीकपात; स्विमिंग पूल अन् वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे नगर परिषदेचे आदेश

फलटण (प्रतिनिधी):
  राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार फलटण नगर परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फलटण शहरात येत्या १६ ऑक्टोबर २०२६ पासून दररोजच्या पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात येणार आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत शहरातील सर्व स्विमिंग पूल आणि वाहन वॉशिंग सेंटर पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  
पाणी पुरवठ्यात कपात करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. यानुसार फलटण नगर परिषदेने हे 'जाहीर 
पाणीकपात: दिनांक १६/१०/२०२६ पासून फलटण शहर हद्दीत दैनंदिन पाणी पुरवठ्यात २०% कपात लागू होईल.  
वॉशिंग सेंटर व स्विमिंग पूल बंद: शहरातील सर्व स्विमिंग पूल व सर्व प्रकारच्या वाहनांचे वॉशिंग सेंटर पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवावे लागतील.  
नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती राहुल निंबाळकर यांनी शहरातील सर्व नागरिकांनी या परिस्थितीची नोंद घेऊन नगर परिषदेस पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.  

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा