नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिसच्या सातारा जिल्हा पदाधिकारी निवडीस लवकरच सुरुवात; वैभव गीते यांची माहिती
सातारा:
नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस (NDMJ) या संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यात विविध पदाधिकाऱ्यांची लवकरच निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये समाजहितासाठी आणि अन्यायाविरुद्ध निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन, त्यांना योग्य पदावर संधी देण्याचे काम संघटनेच्या वतीने सुरु आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती संघटनेचे प्रतिनिधी राज्य सचिव तसेच ॲट्रॉसिटी कायदे तज्ञ वैभव गीते यांनी दिली.
समाजात निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेत योग्य सन्मान देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार आहे. ही सर्व निवड प्रक्रिया ऑनलाईन व संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
ॲट्रॉसिटी कायद्याचा सखोल कायदेशीर अभ्यास व मार्गदर्शन
संघटनेच्या आगामी वाटचालीबद्दल बोलताना वैभव गीते म्हणाले की, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत (ॲट्रॉसिटी अॅक्ट) समाजात योग्य जनजागृती करणे आणि या विषयावर सखोल कायदेशीर अभ्यास व मार्गदर्शन वर्ग आयोजित करणे हे संघटनेचे मुख्य ध्येय असणार आहे. पीडितांना योग्य तो कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सदैव तत्पर राहील.
सातारा जिल्ह्यातील ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना निस्वार्थपणे समाजाची सेवा करायची आहे आणि संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्याची इच्छा आहे, त्यांनी तात्काळ सातारा जिल्ह्यातील संघटनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन वैभव गीते यांनी केले आहे.
Comments
Post a Comment