क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत डंका

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा २०२६ -२७
क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे मधील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत 17 वर्षीय वयोगटातून प्रथमेश लतेश वाघमोडे यांनी तृतीय क्रमांक मिळवून व 14 वर्षे वयोगटातून कु .आकांक्षा बाबासो शेंडगे हिने चतुर्थ क्रमांक मिळवून कोल्हापूर विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांच्या या यशामुळे सरडे गावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल मधील १४ व १७ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी आपली कौशल्य जिद्द मेहनत आणि खेळातील शिस्त यांच्या जोरावर आपली छाप पाडली त्यांच्या या यशामागे मार्गदर्शक क्रीडाशिक्षक श्री आप्पासाहेब वाघमोडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले योग्य प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून आगामी विभागीय स्पर्धेत ही ते उत्कृष्ट कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव श्री हनुमंतराव एजगर सर संस्थेचे अध्यक्ष श्री शत्रुघ्न बेलदार संचालक सुखदेव बेलदार ,कांचनताई पाटील तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अनिल खलाटे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले
प्रथमेश वाघमोडे आणि आकांक्षा शेंडगे यांच्या यशामुळे सरडे गावच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राच्या नावलौकिकात भर पडली आहे दोन्ही खेळाडूंनी आगामी कोल्हापूर विभागीय स्पर्धेत ही यशाची परंपरा कायम राखावी आणि सरडे गावाचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक क्रीडा प्रेमी आणि सरडे गाव नागरिकांनी दिल्या

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा